Pune Yervada Flyover Accident
esakal
काही दिवसांपूर्वी नवले ब्रीजवर काही गाड्या एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला होता. तसाच अपघात आता येरवड्यातील गोल्फ चौक उड्डाणपूल जवळ झाला आहे. यावेळी ७ ते ८ गाड्या एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात सुरु असलेल्या अपघाताच्या घटनांनी पुणेकरांची चिंता वाढली आहे.