Violent Clash Inside Yerwada Jail Barrack
पुणे : येरवडा कारागृहातील बराकीत झालेल्या वादातून दोन कैद्यांनी दुसऱ्या कैद्यावर फरशीने हल्ला केला. कैद्याच्या डोक्यात व कमरेला फरशीने वार करत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कैद्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत