भाव नसल्याने शेतकऱ्यांनी झेंडू फेकला, व्यापाऱ्यांनी तोच गोळा करून २०० रूपयांना विकला

पुणे : कमी भावामुळे शेतकऱ्यांनी झेंडू रस्त्यावर फेकला; दुपारनंतर वाढला भाव
पुणे : कमी भावामुळे शेतकऱ्यांनी झेंडू रस्त्यावर फेकला; दुपारनंतर वाढला भावsakal

उंड्री : गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना दहा-वीस रुपये झेंडूचा भाव मिळत होता. तर बाजारात ७०-८० रुपये किलोने झेंडूची विक्री होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तोच भाव ५० रुपयांवर खाली आला. झेंडूचा बाजार खाली येत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सकाळी टेम्पोच्या टेम्पो रस्त्याच्या कडेला टाकून दिले. मात्र, दुपारनंतर तोच झेंडू दोनशे-अडीचशे रुपयांवर पोहोचला. त्यामध्ये व्यापारी मालामाल झाले, तर शेतकरी रिकामेच राहिले.

बोरीऐंदी फाटा आणि सहजपूरफाटा येथे शेतकऱ्यांनी आज (गुरुवार, दि. ४) सकाळी रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी झेंडू टाकला. मात्र, दुपारनंतर झेंडूला मागणी वाढताच अनेक विक्रेत्यांनी तेथून झेंडू आणला आणि २००-२५० रुपये किलोने विक्री केली. शेतकऱ्यांच्या नशिबी कायम उपेक्षाच आली आहे, अशी भावना वडकीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मागिल दीड वर्षांपासून कोरोनाने सर्वांनाच हरवले. मात्र, यावर्षी कोरोनाचा ज्वर कमी झाला आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. दसरा-दिवाळी सणाला झेंडूला मोठी मागणी असते, दोन पैसे मिळतील म्हणून शेतकरी दिवसरात्र रानात राबून पिक घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील आणि दिवाळी गोड होईल, अशी आशा होती. मात्र, गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये दहा-वीस रुपये बाजार भाव मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्त्याच्या कडेला झेंडू टाकून दिला. शेतकरी नेहमीच तोट्यात जातो, तशाच प्रकार यावर्षीही झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

औताडेवाडी (ता. हवेली) येथील पांडुरंग औताडे म्हणाले की, शेतमालाला हमी भाव नसल्याने शेतकरी नेहमीच तोट्यात जातो. शासनाने शेतमालाला किमान भाव ठरवून द्यावा, ही अनेक वर्षांपूर्वीची मागणी ज्या दिवशी पूर्ण होईल, त्या दिवशी शेतकरी समाधानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भगवान जाधव आणि संतोष घोलप यांनी सांगितले की, गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फुलबाजारात झेंडूचे आवक मोठ्या प्रमाणात जाल्याने बाजार पडले. त्यामुळे शेतकरी हताश झाला. अखेर शेतकऱ्यांनी सकाळी झेंडूची फुले रस्त्याच्या कडेला टाकून दिली. मात्र, दुपारनंतर झेंडूने भाव खाल्ला आणि झेंडूचा २००-२५० रुपयांवर किलोचा भाव झाला. बाजारातील चढ-उतारामुळे व्यापारी मालामाल झाला आणि शेतकरी कंगाल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com