

Pune ZP Students Head to NASA
Sakal
पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे २५ विद्यार्थी शुक्रवारी (ता. १४) नासा भेटीसाठी रवाना होणार आहेत. हे विद्यार्थी वॉशिंग्टन, ऑरलॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को या तीन शहरांचा दौरा करणार आहेत. त्याचबरोबर ५० विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा झाला असून, आणखी ५० विद्यार्थी आणि १० शिक्षकांसाठी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनसह इतर ठिकाणांना भेटीचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.