पुणे झेडपीला परत मिळाली कोट्यवधीची जागा

narayngaon
narayngaon

नारायणगाव (पुणे) : प्राथमिक शिक्षण सेवा संघ नारायणगाव या नावाने असलेली येथील सिटी सर्वे नंबर १४६३ मधील तीस गुंठे जागा जिल्हा परिषदेकडे पुन्हा वर्ग करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक पुणे यांनी दिला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये किमतीची येथील जागा पन्नास वर्षानंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आली आहे.

याबाबत सरपंच योगेश पाटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेली येथील गोकुळ दूध डेअरी समोरील गावठाण हद्दीतील सुमारे तीस गुंठे जागा सन १९७० मध्ये भूमीअभिलेख दप्तरी जिल्हा परिषद अध्यक्ष (मराठी शाळा) या नावे होती. जिल्हा परिषद यांच्या अनुदानातून या जागेत बांधकाम करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमीलेख यांच्या आदेशानुसार १५ मे २०११ रोजी ही जागा प्राथमिक शिक्षण सेवा संघ नारायणगाव या नावे करण्यात आली. या जागेत अनधिकृतरित्या शिवाई ज्ञान मंदिर ही खासगी शाळा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा अधीक्षक भूमीलेख यांच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा परिषद पुणेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील केले होते. जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांनी ही जागा जिल्हा परिषद पुणे यांच्या नावे करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सन १९७० नंतर पन्नास वर्षानंतर ही जागा पुन्हा जिल्हा परिषद पुणे यांच्या ताब्यात गेली आहे. 

या जागेला संरक्षक भिंत घालण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिला आहे. सध्या या जागेत असलेल्या शिवाई ज्ञान मंदिर शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या साठी संस्था चालकांनी शाळेचे अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन पाटे यांनी केले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com