पुणे जिल्हा परिषद बळीराजाच्या पाठीशी; 'या'साठी देणार अनुदान!

Farmer
Farmer
Updated on

पुणे : केवळ बैलांअभावी शेती कसण्यापासून कोणीही शेतकरी मागे राहू नये, या उद्देशाने आता बैलजोडी खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर बैलजोडी खरेदी करता येणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले.                

जिल्ह्यातील विविध बँका बैलजोडी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देत असतात. शिवाय राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फतही बैलजोडी खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना आहे. मात्र, छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा घटक अनेकदा वंचित राहत आहे. शिवाय संबंधित शेतकऱ्याकडे बैलजोडी खरेदीसाठी आर्थिक बळही नसते.

परिणामी, अनेक लहान शेतकऱ्यांची शेती ही केवळ कसण्याअभावी पडीक राहते. यावर मार्ग काढण्यासाठी आणि लहान शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदी करता यावी, हा या योजनेच्या अंमलबजावणीमागचा जिल्हा परिषदेचा हेतू आहे.

यानुसार बैलजोडीची किंमत ७५ हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यापैकी पन्नास टक्के म्हणजेच ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान प्रति शेतकरी दिले जाणार आहे. तसेच या बैलजोडीचा विमाही काढून दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune's Prestige at Stake: Foul-Smelling Water on FC Road Sparks Public Outrage
Anushka Harke wins Teen India empowers 2026 title
AI career guidance helps students choose future-ready skills, colleges, branches, and competitive exam strategies in a rapidly changing job market.
Anil Pawar Escapes Major Injury After Sickle Attack Near Indapur Municipal Council
Marathi News Esakal
www.esakal.com