पुणे : कलाकार आणि तृतीयपंथियांना झेडपीचा आधार; जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

ZP-Pune
ZP-Pune

पुणे : लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध कलाकार आणि तृतीय पंथियांच्या मदतीला पुणे जिल्हा परिषद धाऊन आली आहे. या सर्वांना शरद भोजन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून (सीएसआर) ५०० कलाकार आणि २०० तृतीय पंथियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.

यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला. यासाठी शहरातील रुणवाल फाउंडेशन, रुणवाल ग्रुप आणि गोल्ड मार्ट ज्वेलर्सने अन्नधान्याचे ७०० किट जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिले. या किटमध्ये प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, तेल, मीठ, साबन आदी वस्तूंचा समावेश होती.

पुण्यातील साधू वासवानी चौकात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, रूणवाल फाउंडेशनच्या संगिता ललवाणी आदी उपस्थित होते.

या अन्नधान्य किटचा लाभ गायक, गायिका, नृत्यांगना, निवेदक, तबलावादक, नेपथ्यकार, कॅमेरामन, स्पॉट बॉय, डोअरकिपर, जादूगार, तालवाद्य, ढोलकीवादक, नाट्य कलाकार, ड्रेपरी, रंगभुषाकार, नृत्य दिग्दर्शक आणि केशभूषा आदी विविध प्रकारच्या कलाकारांना देण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com