

Pune ZP winners list NCP alliance sweeps district council polls
Esakal
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७३ पैकी ६४ जागांचे निकाल आता समोर आले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ४३ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपने ८, ठाकरे गटाने ७, शिवसेनेनं पाच आणि शरद पवार गटाने एक जागा जिंकली आहे. काही धक्कादायक निकालही या निवडणुकीत लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.