esakal | पुणे झेडपी घेणार दुर्बलांना आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Pune ZP

पुणे झेडपी घेणार दुर्बलांना आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (Rural Area) आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना (Weak) आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने (ZP) पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बॅंकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या मुद्रा कर्ज योजनेचा (Mudra Loan Scheme) लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी तालुकास्तरावर बॅंकर्स समित्यांची स्थापना केली आहे. या समितीची बैठक आयोजित करून, त्यासाठी सर्व बॅंकांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. (ZP will Take Initiatives to Provide Financial Support Weak)

या बैठकांच्या समन्वयाची जबाबदारी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. या तालुकास्तरीय बॅंकर्स समितीच्या माध्यमातून शेतकरी, किरकोळ विक्रेते आणि महिला बचत गटांना त्यांच्या व्यवसायासाठी अल्प किंवा माफक व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हेही वाचा: पत्नीनेच केला नवऱ्याचा खुन, अन् रचला आत्महत्येचा बनाव

या बॅंकर्स समितीची पहिली बैठक जुन्नर पंचायत समितीने घेतली आहे. टप्याटप्याने सर्वच तालुक्यात या बैठका घेतल्या जाणार आहेत. या समितीच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या माफक व अल्प व्याजदरातील कर्ज योजनांबाबत जनजागृतीही करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून जादा व्याज दराने कर्ज घेऊ नये. जेणेकरून शेतकऱ्यांची सावकारांच्या पाशातून सुटका होऊ शकेल. शिवाय संबंधित शेतकऱ्यांना बॅंकांकडून माफक दरात कर्ज मिळू शकेल. पर्यायाने शेतकरी, किरकोळ विक्रेते आणि महिला बचत गट हे कर्जाच्या बोझ्याने दबले जाणार नाहीत. परिणामी ते आर्थिक संकटातून बाहेर पडून सक्षम होऊ शकतील, हीच या मोहिमेच्या अंमलबजावणीमागची जिल्हा परिषदेची मुख्य भूमिका असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांना अगदी कमी वेळेत, कमी खर्चात आणि माफक व्याज दरात सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी या तालुकास्तरीय बॅंकर्स समितीत तालुका सहायक निबंधक (सहकारी संस्था), तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित तालुक्यातील सर्व बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी आदीचा समावेश केला आहे.

हेही वाचा: ‘जिसका माल, उसका हमाल’च्या अंमलबजावणीस देशात प्रारंभ

बॅंकर्स समितीची जबाबदारी

- तालुकास्तरावर बैठक आयोजित करणे

- बैठकीसाठी कर्ज वितरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलावणे

- शेतकरीविषयक सुलभ कर्ज योजनांची माहिती देणे

- कर्ज मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून मदत करणे

- महिला बचत गटांना व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे

loading image