पुण्यात कोरोनाने रोखला १९४ जणांचा श्वास; मृतांचा आकडा दोनशेच्या उंबरठ्यावर! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

पुण्यात नऊ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतरच्या जेमतेम २०-२१ दिवसांत तो जीवघेणा ठरला आणि तेव्हाच ३० मार्चला बळी गेला. त्यानंतर काही फारशा वेगाने न पसरलेला कोरोना गेल्या महिनाभरात मात्र, झपाट्याने विस्तारला आहे. त्यात पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ३ हजार ९१७ रुग्ण सापडले.

पुणे : पुण्यात 'एन्ट्री' केल्यापासून प्रचंड दहशत माजविलेल्या कोरोनाने गेल्या दीड महिन्यांत जवळपास दोनशे पुणेकरांचा श्वास कायमचाच रोखला आहे. म्हणजे, रविवारच्या रात्रीपर्यंत १९४ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. तर दीडशे रुग्णांची प्रकृती गंभीर करीत कोरोनाने आणखी भयावह रुप दाखविले आहे. कोरोनाने ज्येष्ठांचाच नाही; तर अगदी ११ वर्षांच्या मुलापासून २७ आणि २८ वर्षाच्या तरुणांचाही जीव घेतला आहे. परंतु, पुणेकरांना दिलासा देत, कोरोनाने आतापर्यंत दीड हजार रुग्णांना बरे केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतापर्यंतच्या १९४ मृत व्यक्तींना कोरोनासोबतच उच्चरक्तदाब, मधुमेह, अवस्था, हदयाचाही त्रास असल्याचे तपासण्यांतून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील कोरोना मृतांचे प्रमाण कमी होऊन ते आता ५.१ टक्के असल्याचे महापालिका सांगत आहेत. तरीही पुणेकरांत मात्र भीती आहे.

- पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; बसने घरी सोडणार तेही मोफत!
 

पुण्यात नऊ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतरच्या जेमतेम २०-२१ दिवसांत तो जीवघेणा ठरला आणि तेव्हाच ३० मार्चला बळी गेला. त्यानंतर काही फारशा वेगाने न पसरलेला कोरोना गेल्या महिनाभरात मात्र, झपाट्याने विस्तारला आहे. त्यात पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ३ हजार ९१७ रुग्ण सापडले.त्यातील साडेसतराशे रुग्ण बरे झाले असले तरी, आतापर्यंत १९४ रुणांचा मृत्यू झाल्याचे आकडे महापालिकेकडे आहेत..

- चिंताजनक; सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात आढळले दोनशेहून अधिक नवे कोरोना रुग्ण!

मृतांमध्ये सुरवातीला ५६ ते ६० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या नोंद आहेत. मात्र, त्यानंतर पर्वतीतील २७ वर्षांच्या तरुणांचाही कोरोनाने मृत्यू झाला.त्यानंतर ३६ आणि ३८ वर्षांच्या पुरुष आणि महिलांचाही बळी गेला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ५० आणि ६० वयाच्या पुढच्या व्यक्तींचे आहे.त्यात सर्वाधिक एका दिवसांत १३ रुग्णांचा बळी गेला आहे. तर याआधी एका दिवसांत ११ जणांचा जीव गेल्याची नोंद आहे. पंधरात दिवसांत मृतांची संख्या रोज ५ ते ७ इतकी असायची; पण ती आता वाढून १० पुढे गेली आहे. सोमवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुणे शहर भेदरले; त्यानंतरच्या काही तासांतच पुन्हा ९ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे.

- 'विद्यार्थ्यांनो गावाकडे जाऊ नका!' पुणे पोलिस सहआयुक्तांनी का केले असे आवाहन?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune,194 people were killed by Corona and total the death count will cross 200