#PuneAirport विमान प्रवाशांची रांगेतून सुटका

सचिन बडे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे - पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या लागणाऱ्या लांब रांगा लवकरच कमी होणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षा तपासणीसाठी आणखी दोन दरवाजे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विमानतळावर सुरक्षा तपासणीचे दहा दरवाजे होणार आहेत. तसेच, विमानतळातून बाहेर पडण्यासाठी तिसरा दरवाजा सुरु करण्यात येणार आहे.

विमानतळावर प्रवाशांना सुरक्षितता तपासणीच्या रांगेत बराच वेळ थांबावे लागते. या समस्येबाबत प्राधिकरणाकडे अनेक प्रवाशांकडून प्रतिक्रिया आल्या होत्या. काउंटर आणि सुरक्षा यासाठी अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत होते. याबाबत पुणे विमानतळाचे संचालक अजय कुमार म्हणाले, ‘‘सध्या आठ सुरक्षा तपासणी दरवाजे आहेत. त्यामध्ये आणखी दोन दरवाजांची वाढ करण्यात येणार आहे. नव्या दरवाजांपैकी पहिला दरवाजा हा सप्टेंबरपर्यंत, तर दुसरा दरवाजा नोव्हेंबरमध्ये कार्यान्वित होईल. विमानतळातून बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा वाढविण्यात येणार आहे.’’

या होणार सुविधा...
    ३ जानेवारीपर्यंत सर्व सोयी उपलब्ध होणार
    १० नोव्हेंबरपर्यंत सुरक्षा तपासणीचे नवे दरवाजे
    हिवाळ्यात ३० नवीन उड्डाणे 
    टर्मिनस इमारतीतील आसनक्षमता १५२४ पर्यंत वाढविणार  
    तीनशे खुर्च्या वाढविणार 

विमानतळातील जागा खूप कमी पडते. प्रवाशांना बसण्यासाठीही जागा पुरत नाही. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची वेगळी सोय नाही. त्याचबरोबर तेथील आरोग्य सुविधा सक्षम केली पाहिजे. या ठिकाणी पुण्यातील खाद्यपदार्थ असावेत. 
- शर्मिला ओस्वाल, अध्यक्षा, ग्रीन एनर्जी फाउंडेशन

शहरातून विमानतळापर्यंत जाण्याचा रस्ता खूप अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी गर्दी होते. विमानतळातील प्रवेशद्वारामध्येही नेहमी गर्दी होते. वाहनतळाची जागा अपुरी आहे. अशा अनेक प्राथमिक सुविधांची कमतरता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.
- मोना देव, प्रवासी

Web Title: #PuneAirport Passenger Traffic