

Police and citizens in Pune pay tribute to the martyrs of the Mumbai 26/11 attacks
sakal
पुणे : मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येला झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक परिसरात पोलिस मित्र संघटनेतर्फे शहीद जवान आणि दिल्लीत झालेल्या स्फोटातील मृतांना मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी आणि डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गिरिशा निंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते.