पुणेकरांनो बाहेर पडताना रेनकोट घ्या

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पुढील चोवीस तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.
Rain
Rainesakal

पुणे : सकाळपासूनच पुणे शहर आणि परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. आकाश पूर्णतः ढगाळ असून दिवसभर बहुतेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आज जर कामासाठी तुम्ही बाहेर पडत असाल रेनकोट किंवा छत्री नक्की बाळगा.

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पुढील चोवीस तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही गुरुवारी (ता.2 डिसेंबर) चक्रीवादळ तयार होऊन, ते आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्याचा परिणाम आज पहाटेपासून पुण्याच्या वातावरणावर जाणवत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरातही अनेक ठिकाणी सध्या रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com