

Hairpin Lodged in Trachea Diagnosed After Persistent Cough
Sakal
पुणे : तीन वर्षीय चिमुकलीच्या श्वसननलिकेत अडकलेली हेअरपिन यशस्वीपणे बाहेर काढत जीव वाचविण्यात आला. ही शस्रक्रिया जहाँगीर रग्णालयात करण्यात आली. दोन आठवड्यांपासून खोकल्याने त्रस्त असलेल्या चिमुकलीचा खोकला गेल्या दोन दिवसांत अधिकच वाढला होता. अनेक ठिकाणी उपचार करूनही फरक न पडल्याने पालकांनी तिला जहाँगीर रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर लाड यांनी केलेल्या तपासणीनंतर तिच्या डाव्या फुप्फुसाच्या नलिकेत हेअरपिन अडकल्याचे स्पष्ट झाले.