#PuneMetro प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच पर्याय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे -  भुयारी मेट्रोच्या फडके हौद आणि मंडई स्थानकामुळे स्थलांतर करावे लागणारी सुमारे ३०० घरे व १०० दुकानांसाठी महामेट्रोने मंडई-कसबा पेठ परिसरातच पाच ठिकाणी प्रत्येकी आठ मजली इमारती उभारण्याची योजना तयार केली आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकामुळे स्थलांतर कराव्या लागणाऱ्या घरांचे आणि दुकानांचे त्याच परिसरात पुनर्वसन होण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुणे -  भुयारी मेट्रोच्या फडके हौद आणि मंडई स्थानकामुळे स्थलांतर करावे लागणारी सुमारे ३०० घरे व १०० दुकानांसाठी महामेट्रोने मंडई-कसबा पेठ परिसरातच पाच ठिकाणी प्रत्येकी आठ मजली इमारती उभारण्याची योजना तयार केली आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकामुळे स्थलांतर कराव्या लागणाऱ्या घरांचे आणि दुकानांचे त्याच परिसरात पुनर्वसन होण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पिंपरी-स्वारगेट मार्गावर शिवाजीनगर कृषी महाविद्यालय मैदान ते स्वारगेटदरम्यान भुयारी मेट्रो मार्ग आहेत. कसबा पेठेतील फडके हौद आणि महात्मा फुले मंडई स्थानकामुळे अनुक्रमे २२५ आणि ७१ घरांचे स्थलांतर करावे लागणार आहे; तर या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे १०० दुकानांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्याला परिसरातील रहिवाशांनी विरोध केला आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या बैठकाही झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महामेट्रोने पाच ठिकाणी प्रत्येक आठ मजली इमारत उभारण्याचे ठरविले आहे. त्यात सुमारे ३८२ सदनिका आणि १०६ व्यावसायिक वापराचे गाळे उपलब्ध होणार आहेत. सदनिकांचा आकार २५० ते ५०० चौरस फूट आहे; तर दुकाने १५० ते २०० चौरस फुटांची असतील. जागामालकांनाही मोबदला मिळणार असून भाडेकरूंना त्याच परिसरात सदनिका उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी रहिवाशांशी चर्चा सुरू आहे. 

सदनिकांमध्ये लिफ्ट असेल; तसेच पुरेशा पार्किंगचीही सुविधा महामेट्रो उपलब्ध करून देणार आहे. भाई कोतवाल मंडईतील इमारतीमध्ये घरे, दुकाने आणि सुमारे १०० स्टॉल्ससाठीही जागा असेल, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. दादोजी कोंडदेव विद्यालयात सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयासाठीही जागा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येथे होणार पाच इमारती 
  भाई कोतवाल मंडई (कसबा पेठ) 
  दादोजी कोंडदेव विद्यालय (कसबा पेठ) 
  कादंबरी बिल्डिंग (म. फुले मंडई, झुणका भाकर केंद्रामागे) 
  पीडीसीसी बॅंकेजवळ (म. फुले मंडई) 
  झाशीची राणी लक्ष्मीबाई विद्यालय (शनिपार) 
  पाचही इमारतींमध्ये ३८२ सदनिका आणि १०६ दुकाने  
  प्रकल्पग्रस्तांची संख्या ः घरे २९१ आणि १०० दुकाने

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: #PuneMetro Five options for project rehabilitation