#PuneMetro जेधे चौकातील स्टॉल्स हलविणार

#PuneMetro जेधे चौकातील स्टॉल्स हलविणार

पुणे - स्वारगेट येथील जेधे चौकातील मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबचे काम सुरू झाल्यामुळे या चौकातील १२४ स्टॉल्स सारसबाग परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या जागा निश्‍चित झाल्या आहेत. स्टॉल्स हलविण्याच्या कामाला आठवड्यात प्रारंभ होईल.

जेधे चौकातील बहुमजली ट्रान्स्पोर्ट हबचे भूमिपूजन नुकतेच झाले. तेथील पाणीपुरवठ्याच्या शेजारील जागेतून भुयारी मेट्रोच्या बोगद्याचे काम सुरू झाले आहे. हब आणि भुयारी मेट्रोच्या कामामुळे सातारा रस्ता आणि नेहरू स्टेडियसमोरील १२४ स्टॉल्स हलविण्यात येणार असून जागा निश्‍चित केल्या आहेत. स्टॉल उभारणीचा खर्च महामेट्रो करणार आहे. 

येथे होणार स्टॉल्सचे स्थलांतर 
मित्र मंडळ चौक, पाटील प्लाझाजवळ 
छत्रपती शिवाजी उद्यान (वेदशास्त्रोत्तेजक सभागृहासमोर) 
बाबूराव सणस मैदानाजवळ 

असे होणार ट्रान्स्पोर्ट हब
जमिनीखाली सुमारे तीन मजले मेट्रोचे भूमिगत स्थानक 
एसटी, मेट्रो आणि पीएमपी स्थानके परस्परांना जोडणार 
दोन भूमिगत पादचारी मार्ग, दोन हजार वाहनांसाठी वाहनतळ 
२६ मजली व्यापारी संकुल, त्यात आठ पडद्यांचे चित्रपटगृह

जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब आणि भुयारी मेट्रोचे काम सुरू झाले आहे. या कामामुजेधे चौकातील स्टॉल्स हलविणारळे तेथे वाहतूक वाढणार आहे. त्यासाठी स्टॉल्सचे स्थलांतर करण्यात येत आहे. लवकरात लवकर काम सुरू पूर्ण करण्यात येईल. 
- अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो

 स्टॉल्सचे स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने तीन जागा निश्‍चित केल्या आहेत. त्या ठिकाणी स्थलांतर होईल. ही प्रक्रिया येत्या पाच-सहा दिवसांत सुरू होईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 
- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख, महामेट्रो

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com