

Indian Railways Plans Major Upgrade for Pune–Nagpur Vande Bharat Route
sakal
पुणे : पुणे-नागपूर (अजनी) वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून या गाडीची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्याच्या आठ डब्यांमध्ये आणखी आठ डबे वाढवून, ती १६ डब्यांची करण्याचा प्रस्ताव पुणे विभागाने मुख्यालय व रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.