Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गाला नदीचे स्वरूप! चाकणजवळ ५ फूट पाणी; बसमधील प्रवाशांची थरारक सुटका, वाहतूक पूर्णपणे ठप्प

Five feet water on Pune Nashik Highway: चाकणजवळ पुणे-नाशिक महामार्ग पाण्याखाली; ३ ते ५ फूट पाण्यात बस अडकली, अग्निशामक दल व स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांची सुटका, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
Bus Passengers Rescued as Floodwaters Inundate Pune–Nashik Highway at Chakan

Bus Passengers Rescued as Floodwaters Inundate Pune–Nashik Highway at Chakan

esakal

Updated on

-हरिदास कड

चाकण: पुणे नाशिक महामार्गाला वाकी खुर्द ता. खेड गावाजवळ तसेच तळेगाव चौक, आंबेठाण चौका जवळ मार्गावर अगदी तीन चार फूट पाणी साचल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे. बस मधील प्रवासीही बस मध्ये अडकले होते . त्या प्रवाशांना अग्निशामक दल तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढले.पुणे नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवासी संंतप्त झाले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या वतीने जेसीबीने डिव्हायडर फोडून पाणी काढण्याचे काम सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com