#PuneRains : पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत

#PuneRains : पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत
Updated on

नारायणगावता : जुन्नर तालुक्यातील येडगाव,वडज, गुंजाळवाडी, नारायणगाव या बागायती भागात बारा तासात १०५ मिलिमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका  फुलोरा व पोंगा अवस्थेतील द्राक्ष बागांना बसला आहे. मागील वर्षी २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमूळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा पाय अजून खोलात जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील दोन महिन्या पासून तालुक्याच्या मध्य व पूर्व भागात पाऊस पडत आहे.या मुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत.दरवर्षी सुमारे पन्नास टक्के द्राक्ष बागांची छाटणी सप्टेंबर  व उर्वरित बागांची छाटणी ऑक्टोबर महिन्यात होत असते.या वर्षी पावसाळी वातावरण व सततचा पाऊस राहिल्याने  द्राक्ष बागांची छाटणी एक महिना लांबली.सप्टेंबर महिन्यात जेमतेम दहा टक्के द्राक्ष बागांची छाटणी झाली.१ऑक्टोबर नंतर उर्वरित द्राक्ष बागेतील छाटणीची कामे घाईघाईने उरकण्याचे काम सुरू आहे. १ ते १० सप्टेंबर दरम्यान छाटणी झालेल्या द्राक्ष बागा फुलोरा अवस्थेत असून १  ऑक्टोबर नंतर छाटणी झालेल्या बहुतेक बागा पोंगा अवस्थेत आहेत.बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फुलोरा व पोंगा अवस्थेतील बागांना बसणार आहे.

पावसामुळे घड जिरण्याचे  प्रमाण वाढणार असून डावणीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.मागील वर्षी  २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमूळे द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याने उत्पादनात तीस टक्के घट झाली होती.त्या नंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्याने निर्यातक्षम द्राक्षाची विक्री दहा रुपये ते तीस रुपये प्रतिकिलोग्रॅम दराने करावी लागली होती. बुधवारी झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत सापडले आहेत.

हरिभाऊ वायकर(उपाध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ): पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने या वर्षी घड निर्मितीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. आलेले घड सुद्धा लहान आकाराचे (अशक्त)आहेत. द्रवरूप खते,सूक्ष्म अन्नद्रव्ये व संप्रेरके वापरून घड तयार करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बुधवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.घड जिरण्याचे प्रमाण वाढल्यास हंगाम वाया जाण्याचा धोका आहे.

रोहन पाटे ( निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक): निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये भांडवली खर्च येतो. मागील वर्षी कोरोनामूळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला. निर्यातक्षम द्राक्ष विक्री मातीमोल भावाने करावी लागल्याने भांडवली खर्च वसुल झाला नाही.या वर्षी पुन्हा नुकसान झाल्यास द्राक्ष बागा कमी करण्याची वेळ येणार आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com