मैलापाणी नदीत येत असल्याने पुण्याचे नामांकन घटले

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात मुळामुठा नदीत येणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे.
drainage water
drainage waterSakal
Summary

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात मुळामुठा नदीत येणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे.

पुणे - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात मुळामुठा नदीत येणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे. त्यामुळे जायका प्रकल्प जो पर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत पुण्याला फाइट स्टार सिटीचे नामांकन मिळणार नाही व पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणे अवघड आहे. पण सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता, जनजागृती आणि बेशिस्तांवर शिक्षा यावर महापालिका काम करणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारतर्फे २०१६ पासून स्वच्छ भारत अभियान राबविले जाते. त्याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर शहरांचे नामांकन जाहीर करून त्यांचा सत्कार केला जातो. गेल्या सहा वर्षापासून इंदूर शहराचा देशात पहिला क्रमांक येत असून, या शहराला सेव्हन स्टार रँकिंगही मिळालेले आहे. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई महापालिका कायमच पहिल्या पाचमध्ये राहिलेली आहे. पण पुण्याला राष्ट्रीय पातळीवर फारशी प्रगती दाखवता आलेली नाही.

२०२० मध्ये पुण्याचा देशात १७वा क्रमांक आला होता, पण २०२१ मध्ये त्यात सुधारणा होऊन थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली होती. त्यामुळे यंदाही अशीच चमकदार कामगिरी दाखवता येईल अशी अपेक्षा होती. दोन दिवसांपूर्वी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला, त्यामध्ये पुण्याचा देशात नववा क्रमांक आला. पण पुण्यापेक्षा लहान असलेली शहरे पुण्यापेक्षा पुढे निघून गेले आहेत. महापालिका प्रशासनाने या निकालाचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये महापालिकेचे गुण का कमी झाले याचा अभ्यास केला असता काही ठळक त्रुटी समोर आल्या आहेत.

आयुक्त कुमार म्हणाले, ‘पहिल्या आठ शहरांनी त्यांच्याकडे मैलापाण्यावर १०० टक्के शुद्धीकरण होते असे दाखविले आहे त्यामुळे त्यांना ५ स्टारपेक्षा जास्त नामांकन मिळाले आहे. पुणे शहर यामध्ये मागे पडल्याने ५ व्या क्रमांकावरून ९व्या क्रमांकावर आले आहे. तसेच केंद्र सरकारकडून वर्षात तीन वेळा नागरिकांचा अभिप्राय घेते, पण त्यात दोन वेळा कमी गुण मिळाले आहेत. शहरात मैलापाणी शुद्धीकरण करण्यासाठी जायका प्रकल्पाचे काम सुरू आहे, हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नामांकन वाढविण्यावर मर्यादा येणार आहे.

देशातील पहिली दहा शहर आणि गुण

इंदूर - ७१४६.४१

सुरत - ६९२४.८४

नवी मुंबई - ६८५२.९१

विशाखापट्टनम - ६७०१.१८

विजयवाडा - ६६९९.३०

भोपाळ - ६६०८.४१

राजकोट -५८४६

अहमदाबाद - ५७२०.८७

पुणे -५७०८.४२

ग्रेटर हैद्राबाद- ५६१२.६४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com