पुणेकर पुन्हा अडकू लागले वाहतूक कोंडीच्या जाळ्यात

कोरोना निर्बंधात जसजशी शिथिलता येऊ लागली आहे, तसतसे शहर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या जाळ्यात अडकण्यास सुरुवात झाली आहे.
Pune Traffic
Pune TrafficSakal

पुणे - कोरोना (Corona) निर्बंधात जसजशी शिथिलता येऊ लागली आहे, तसतसे शहर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या (Traffic) जाळ्यात अडकण्यास सुरुवात झाली आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भागच नव्हे, तर उपनगरांमध्येही वाहतूक कोंडीचा जाच वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास वाहतुकीमध्ये अडकण्याची वेळ येत आहे. (Punes People Started Getting Stuck in Traffic Jams Again)

कोरोनामुळे सातत्याने होणाऱ्या लॉकडाउनमुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी आतापर्यंत कमी होती. परंतु, संसर्ग कमी झाल्याने निर्बंधही हळूहळू शिथिल होऊ लागल्याने रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढली. विशेषतः सोमवार ते शुक्रवारपर्यंत रस्त्यांवर वाहने मोठ्या संख्येने दिसत आहेत. आतापर्यंत लॉकडाउनमुळे वाहतूक कोंडीची तीव्रता जाणवली नाही. परंतु, आता शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोजच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी तीन ते चार रस्ते एकत्र आल्याने होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीवर ताण वाढत आहे.

Pune Traffic
पुणे : कोव्हीशील्डचे १८६ केंद्रावर उद्या (गुरुवारी) मिळणार ६२ हजार डोस

मेट्रो, जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, केबल अशा अनेक कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली. खोदाईमुळे अनेक रस्ते बंद असल्याने अर्ध्या रस्त्यावरच वाहतूक सुरु आहे. या सगळ्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

मध्यवर्ती भागात दररोजच कोंडी

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यांवर दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापारीही त्रस्त झाले आहेत.

वाहतूक कोंडीची कारणे

  • पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे

  • शहराच्या मध्यवर्ती भागात रस्ते खोदाई, मेट्रो, पुलांची कामे

  • चौकाचौकांतून होणारी खासगी प्रवासी वाहतूक

  • दोन ते तीन रस्ते एकत्र आल्यामुळे त्याठिकाणी होणारी वाहनांची गर्दी

  • अरुंद रस्ते व त्या परिसरातील बेकायदेशीर पार्किंग

  • बाह्यवळण रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाढती संख्या

  • सातत्याने बंद पडणारी सिग्नल यंत्रणा

Pune Traffic
खडकवासला प्रकल्पात बुधवार अखेर ८४ टक्के पाणीसाठा

समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना

  • सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण होण्याची आवश्‍यकता

  • मंजूर उड्डाणपुलांची कामे जलदगतीने व्हावीत

  • आवश्‍यक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण

  • पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी

  • पर्यायी रस्ते निर्माण करण्यास प्राधान्य देण्याची गरज

  • खासगी बससाठी थांब्याची व्यवस्था करावी

इथे होते कोंडी...

  • कात्रज - कात्रज-देहू बाह्यवळण, कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रज मुख्य चौक, भारती विद्यापीठ चौक, वारजे उड्डाणपूल, चांदणी चौक

  • गणेशखिंड रस्ता - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते सेंट्रल मॉल

  • कर्वे रस्ता - अभिनव चौक, दशभुजा गणपती चौक, मेहेंदळे गॅरेज ते महादेव मंदिर चौक

  • सिंहगड रस्ता - हिंगणे चौक, माणिक बाग चौक, राजाराम पुलाजवळील पानमळा

  • बाणेर - सायकर चौक, म्हाळुंगेजवळील सदानंद हॉटेल चौक

  • सेनापती बापट रस्ता - जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता

Pune Traffic
आधी खड्डे बुजवा मग पुढचे काम करा; प्रशासनाला आदेश

पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि सातत्याने होणाऱ्या खोदाईमुळे शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनांची गती कमी होते. रस्त्यांवरील खड्डे व सदोष सिग्नल दुरुस्त करण्याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे.

- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.

मी औंधमध्ये राहण्यास असून कोरेगाव पार्कमध्ये नोकरीस आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी पुणे विद्यापीठापासून ते सेंट्रल मॉलपर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीत अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. रेंजहिल्स येथे वाहनांची गर्दी असते. त्यामुळे कामावर जायला उशीर होतो.

- केतन पाटील, नोकरदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com