
पुणे : ‘पीएमपी’च्या प्रवाशांना आता लवकरच आपल्या मोबाईल ॲपद्वारे मेट्रोचेदेखील तिकीट काढता येणार आहे. कारण, नुकतेच ‘पीएमपी’ प्रशासन व मेट्रो प्रशासन यांच्यात बैठक झाली असून दोघांची तिकीट प्रणाली एकमेकांच्या सॉफ्टवेअरशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या एपीआय (ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) हस्तांतर करण्याबाबत सहमती झाली आहे. शिवाय ‘पीएमपी’ व मेट्रो प्रशासनाचे तांत्रिक विभागाचे चमूदेखील या आठवड्यात बैठक घेणार असून, यात ही नवी प्रणाली कधीपासून कार्यान्वित करायची, याबाबत निर्णय होणार आहे.