#PuneSafety पहाटे वाढविणार पोलिसांची गस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे - सोनसाखळी चोरीबरोबरच चोरट्यांकडून पहाटे प्रवाशांची होणारी लूटमार थांबविण्यासाठी पहाटेच्यावेळी पोलिसांची गस्त वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली.

शहराच्या वेगवेगळ्या भागात सोनसाखळी चोरी, रिक्षातून पर्स व मौल्यवान वस्तू हिसकावणे आणि पहाटेच्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या बसथांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांची लूट करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. हा गंभीर प्रश्‍न पोलिस उपायुक्त तेली यांच्यासमोर पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनेविषयीची माहिती तेली यांनी दिली.

एप्रिल ते मे या कालावधीमध्ये सकाळच्या ठराविक वेळेमध्ये सोनसाखळी चोरी, रिक्षा प्रवाशांच्या पर्स चोरून नेणे व प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत. पहाटे पाच ते सकाळी आठ, तसेच दुपारी बारा या वेळेत या घटना घडत असल्याची सद्यःस्थिती आहे. नेमक्‍या या वेळेतच रात्रपाळीच्या पोलिसांची ड्यूटी संपलेली असते. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे तेली यांनी कबूल केले.

चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच या पथकाकडून बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसर, गर्दीची ठिकाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली जाईल. त्याद्वारे चोरट्यांवर नियंत्रण मिळविण्यात येणार असल्याचे तेली यांनी सांगितले.

Web Title: #PuneSafety Police patroling will increase in the morning