#PuneTraffic पुणेकर आणखी पाच वर्षे वाहतूक कोंडीतच

मंगेश कोळपकर
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्‍क्‍यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. बाकीचे प्रकल्प कागदोपत्रीच. त्यांच्या पूर्ततेचा कालावधीही अजून तीन ते पाच वर्षे आहे. हे प्रकल्प पूर्ण होतील अन्‌ वाहतुकीच्या जीवघेण्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र त्याबद्दल खेद ना खंत...

स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्‍क्‍यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. बाकीचे प्रकल्प कागदोपत्रीच. त्यांच्या पूर्ततेचा कालावधीही अजून तीन ते पाच वर्षे आहे. हे प्रकल्प पूर्ण होतील अन्‌ वाहतुकीच्या जीवघेण्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र त्याबद्दल खेद ना खंत...

मेट्रो
 पिंपरी-स्वारगेट, वनाज-रामवाडी 
 दोन मार्गांचे विस्तारीकरण, अन्य मार्गांचा प्रकल्प अहवाल अद्याप बाकी 
 २०२०-२१ मध्ये पूर्ण होणार 
 सुमारे ११ हजार कोटी खर्च  
 पुढील वर्षात - एलिव्हेटेड मेट्रोचे काम पूर्ण होणार, स्थानके उभारणार

पीएमआरडीएची मेट्रो
 हिंजवडी-शिवाजीनगर ; २३ किलोमीटर
 प्रकल्प अहवाल पूर्ण; निविदा प्रक्रिया सुरू 
 २०२१-२२ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार
 खर्च सुमारे ६ हजार कोटी 
 पुढील वर्षात - एलिव्हेटेड मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार

पीएमपी
 १००० बस येण्याची प्रक्रिया कागदोपत्री 
 ५०० पैकी १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा; ५०० सीएनजी बसच्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू
 नव्या बस येण्यासाठी ८ महिने लागणार 
 सुमारे २५० कोटी खर्च 
 पुढील वर्षांत - बस खरेदी, डेपो विकास 

बीआरटी
 दोन्ही बाजूला दरवाजा असलेल्या 
४०० नव्या बस बीआरटीसाठी लागणार 
 बीआरटी मार्गांचे विस्तारीकरण रखडले 
 बीआरटीच्या पायाभुत सुविधाही अपुऱ्या 
 दोन्ही महापालिकांकडे निधी उपलब्ध 
 पुढील वर्षांत - नव्या मार्गांचे काम सुरू होण्याची शक्‍यता अंधुक

उच्चक्षमता द्रुतगती बाह्यवळण वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) 
 महापालिका हद्दीतून ३६ किलोमीटरचा वर्तुळाकार रस्ता तयार करण्याचे नियोजन 
 प्रकल्प अहवाल महापालिकेच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडे सादर 
 प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी - काम सुरू झाल्यावर ५ वर्षे
 सुमारे ६ हजार कोटींचा प्रकल्प 
 पुढील वर्षांत - अंमलबजावणी कोण व कशी करणार, हे निश्‍चित होण्याची अपेक्षा

उपनगर रेल्वे
 लोणावळा-दौंड लोकल वाहतूक
 रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रक्रिया अद्याप रखडलेली 
 प्रकल्पाला फारसा खर्च नाही; नव्या रॅक घ्याव्या लागणार 
 प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी ः काम सुरू झाल्यापासून सुमारे ४ वर्षे
 पुढील वर्षात - हडपसर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले तर पुढचे पाऊल

आंतरराष्ट्रीय विमानतळ
 पुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 
 भूसंपादनाची प्रक्रिया रखडली
 सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प 
 निविदा तयार करण्यास सुरवात
 २०२१-२२ पर्यंत पूर्ण होणार 
 पुढील वर्षात - भूसंपादनाची काही प्रमाणात शक्‍यता 

हायपर लूप
 पुणे-मुंबईचे अंतर हायपर लूपद्वारे ३० मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रकल्प 
 निविदा प्रक्रिया सुरू; पीपीपी 
(सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर होणार 
 एलिव्हेटेड पद्धतीने होणार 
 काम सुरू झाल्यावर ५ वर्षे लागणार 
 पुढील वर्षात - प्री फिजिब्लिटी अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण होणार

सायकल ट्रॅक
 शहरात ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्याचे नियोजन 
 सध्या ११० किलोमीटरचे सायकल ट्रॅक ; परंतु त्यावरही अतिक्रमणे 
 सायकल ट्रॅकसाठी केंद्र सरकारचा निधी मिळण्यासाठी प्रकल्प सादर 
 पुढील ५ वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता 
 पुढील वर्षात - किमान ७५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक अस्तित्त्वात आणण्याचे नियोजन

रिंग रोड
 १२८ किलोमीटरचा रिंग रोड उभारण्याचे नियोजन 
 भूसंपादन रखडले 
 प्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार कोटी 
 प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी २०२२-२३
 पुढील वर्षांत - काही प्रमाणात भूसंपादन आणि पहिल्या टप्प्यातील काम सुरू

जल वाहतूक
 पुण्यातील ४४ किलोमीटरच्या मुठा-मुळा नदीपात्रात वाहतुकीचा प्रकल्प 
 प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेत रखडली 
 केंद्र, राज्य सरकार मदत करण्यास तयार 
 काम सुरू झाल्यावर ५ वर्षांत 
प्रकल्प होणार
 पुढील वर्षात - प्रकल्प अहवाल तयार होण्याची शक्‍यता

Web Title: #PuneTraffic Traffic in Pune