जुन्नरमध्ये मास्क न वापरणाऱ्या 'एवढ्या' जणांवर दंडात्मक कारवाई

दत्ता म्हसकर
रविवार, 28 जून 2020

नागरिकांना मास्क वापरण्याबाबत शहरात जनजागृती केली. दवंडी,  प्रसिद्धीकरण आदी माध्यमातून नागरिकांना सूचना करण्यात आल्या नंतर आज ता.२८ रविवार पासून शहरातील रस्ते, मुख्य रस्ते, बाजारपेठातून मास्क न लावणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात आला.

जुन्नर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर आज (ता.२८) रविवार पासून दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. यात एकूण ४५ जणांवर दंडात्मक कारवाई करून १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांना मास्क वापरण्याबाबत शहरात जनजागृती केली. दवंडी,  प्रसिद्धीकरण आदी माध्यमातून नागरिकांना सूचना करण्यात आल्या नंतर आज ता.२८ रविवार पासून शहरातील रस्ते, मुख्य रस्ते, बाजारपेठातून मास्क न लावणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात आला. यात काही दुकानदार देखील आहेत. आरोग्य विभागाच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. यावेळी जुन्नरचे पोलीस निरीजशक युवराज मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगर पालिकेस सहकार्य केले.  लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली गेल्याने विविध कामासाठी तसेच विनाकारण नागरिकांचे रस्त्यावर  येण्याचे प्रमाण वाढले होते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.अनेक नागरिकांनी देखील मास्क न वापरल्यास दंड करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

जुन्नर शहराच्या परिसरातील गावातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आपल्या व दुसऱ्याच्या सुरक्षेसाठी मास्क वापरणे काळाची गरज  असल्याचे असे डॉ.काटकर यांनी सांगितले.  काही पानटपऱ्या अनधिकृतपणे सुरू केल्याच्या तक्रारी असून येथे जवळपास तंबाखू, गुटका खाऊन थुंकणारे आढळून येतात त्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

जुन्नर नगर पालिका हद्दीतील व्यावसायिक आस्थापनांनी कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी नगर पालिका क्षेत्रात रहिवासी असलेल्या व कामानिमित्त जुन्नर शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांने सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालावा व दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitive action against 45 people for not wearing mask in Junnar