Vijay P. Bhatkar : विजय भटकर यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
Vijay P. Bhatkar
Vijay P. Bhatkarsakal

पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुण्यभूषण पुरस्कारासाठी भटकर यांची निवड केली आहे. पुरस्काराचे ३६ वे वर्ष आहे. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून वाढवून दोन लाख रुपये केली आहे. याशिवाय सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि पुण्यभूषण स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Vijay P. Bhatkar
Nashik Pune Highway : अवजड वाहनांची वाहतूक सोयीपेक्षा गैरसोयीचीच; वळविलेल्या वाहतुकीने अपघाताचे प्रमाण वाढले

हा पुरस्कार वितरण सोहळा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यंदा या पुरस्कार सोहळ्यात सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार जवानांचा आणि एका वीरमातेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com