esakal | पुण्यशलाका’ची काश्मीरमध्ये सायकल राईड
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यशलाका

पुण्यशलाका’ची काश्मीरमध्ये सायकल राईड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्वात एक आगळा-वेगळा व स्त्री शक्तीला प्रोत्साहित करणारा उपक्रम म्हणजेच बारामुल्ला ते कमान अमन सेतू येथे महिलांसाठी होणारा ‘राईड काश्मीर. जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या सैन्यदलाच्या १९ इनफन्ट्री डिव्हिजनतर्फे देशाच्या महिलांसाठी हा अनोखी सायकल राईड मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये पुण्यातील ‘पुण्यशलाका’ हा महिलांचा गट सहभाग घेत आहे.  

पुण्यशलाका या गटातील महिलांद्वारे आतापर्यंत देशांतर्गत व देशाबाहेर सायकल मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. काश्मीर येथील सायकल राईड मोहिमेत डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. अश्र्विनी कुलकर्णी, डॉ. अनघा दुधभाते, रोहिणी टिळक, साधना लेले, भाग्यश्री पराडकर, सोनाली ओगले, देवयानी साधू, डॉ. मैथिली जोग, सीमा सावंत आणि रोहिणी ढवळे अशा विविध क्षेत्रातल्या ३० ते ६० वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला आहे. ही मोहीम रविवारी (ता. १२) होणार असून यासाठी पुण्यातील महिला सायकलिस्टचा गट शनिवारी (ता. ११) विमानाने काश्मीरसाठी जाणार आहोत.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवू

याबाबत साधना लेले यांनी सांगितले, ‘‘देशाच्या सीमेवर लढा देऊन देशबांधवांचे रक्षण करून न थांबता देशातील विशेषतः सीमाभागातल्या बांधवांचे देशाच्या इतर राज्यातील बांधवांशी संबंध अधिक प्रेममयी व सशक्त व्हावे. तसेच काश्मीरच्या नागरिकांना देशाच्या इतर संस्कृतीची माहिती मिळावी, शालेय मुलांना सायकलचे महत्त्व पटवून देणे. या सर्व उद्देशाने ही सायकल राईड सैन्यदलाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातून १०० हून अधिक महिला सहभाग घेणार आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला या उपक्रमाची माहिती मिळाली. तेव्हाच या मोहिमेत सहभाग घेण्याचे आम्ही ठरविले.

हेही वाचा: नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

सेनेच्या निगराणीत होणार प्रवास :

कधी निसर्गाचा, कठीण रस्त्यांचा तर कधी प्राप्त केलेल्या यशाचा म्हणून प्रत्येक सायकल सफारीचा एक वेगळा आनंद असतो. मात्र ही सायकल मोहीम वेगळी आहे. सैन्यदलाने याचे आयोजन केल्यामुळे हा अनुभव इतर मोहिमांच्या तुलनेत नक्कीच वेगळा असेल. सेनेच्या निगराणीत हा प्रवास सायकलवरून करायला मिळणार आहे. ही एक अनमोल संधी आहे, असे या महिला सायकलिस्ट गटाचे म्हणणे आहे.

loading image
go to top