पुरंदर विमानतळासाठी तीन मार्ग प्रस्तावित

Purandar-Airport-Route
Purandar-Airport-Route

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून, तो सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असेल; तसेच या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी तीन मार्ग प्रस्तावित आहेत. 

‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यास राज्य सरकारकडून मंजुरीही मिळाली आहे. या मार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा मिळावा, याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून, पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. 

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी या रिंगरोडवरून एकूण तीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी एक मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल. विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तीनपैकी एक मार्ग विमानतळासाठी निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

रिंगरोडचा खर्च १४ हजार कोटी
‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडची एकूण लांबी सुमारे १६६ कि.मी. आहे. खेड, शिरूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्‍यांतून रिंगरोड जाणार आहे. यासाठी २ हजार ३०० हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून, प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com