विमानतळ सर्वेक्षण पाडले बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

‘आमच्याशी चर्चा केल्याशिवाय, आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या गावात सर्वेक्षणासाठी पाऊल ठेवाल, तर याद राखा,’ असा इशारा पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळबाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना दिला व सर्वेक्षणाचे साहित्य ताब्यात घेऊन काम बंद पाडले.

पारगाव मेमाणे - ‘आमच्याशी चर्चा केल्याशिवाय, आम्हाला विचारल्याशिवाय आमच्या गावात सर्वेक्षणासाठी पाऊल ठेवाल, तर याद राखा,’ असा इशारा पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळबाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना दिला व सर्वेक्षणाचे साहित्य ताब्यात घेऊन काम बंद पाडले.

नुकतेच विमानतळाच्या नियोजित जागेचे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच येथील संतप्त शेतकऱ्यांनी संबंधितांकडून लॅपटॉप, ड्रोन कॅमेरा व इतर सर्वेक्षणाचे साहित्य ताब्यात घेत सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना पारगाव मेमाणे येथे थांबवून ठेवले. आमच्या गावात परवानगीशिवाय पाऊल टाकाल, तर खबरदार,  असा इशाराही पारगाव  एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी  या गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी दिला. 

या वेळी पोलिसांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची साहित्यासह सुटका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purandar Airport Survey work Close by farmer