शेततळे खोदाईत पुरंदर अव्वल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

सासवड - राज्य सरकारच्या कृषी विभागाने राबविलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत पुरंदर तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात २ हजार ५०० शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी १ हजार ९८९ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यात पुरंदर तालुक्‍यातील ५६७ शेततळ्यांचा समावेश आहे. उर्वरित १२ तालुक्‍यांत मिळून १ हजार ४२२ तळी पूर्ण झाली आहेत. 

ही योजना सुरू झालेल्या दोन वर्षांत पुरंदर तालुक्‍यातील ५६७ शेततळ्यासाठी सर्वाधिक २ कोटी ४४ लाख २ हजार रुपये खर्च झाले आहेत. पुरंदरनंतर इंदापुरात ४५२, बारामतीत ३०५, शिरूरमध्ये २०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात २ हजार ५०० शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट होते, त्यातील ६८ शेततळ्यांची कामे अजून सुरू आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांनी लाभासाठी पुढे यावे - ढगे
एका शेततळ्यास कमाल ५० हजार व कागदासाठी ७५ हजार रुपये निधी मिळतो. शेतकऱ्यांच्या १ हजार ४४६ अर्जांना पूर्वसंमती दिली आहे, तर ११०० तळ्यांचे कामाचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे अजून शेततळी होतील. यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आहे. कृषी विभागही ऑनलाइन अर्ज स्वीकारून सहकार्य करेल. शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी केले. 

Web Title: Purandar topper in Farm pond