Pune : पावसाच्या कहरामुळे पिसर्वेत सासवड सुपारस्त्यावरील वाहतूक बंद

पूर्व भागातील सर्वच गावात पावसाचा कहर
Pune
Pune sakal

माळशिरस : पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये काल रात्री पावसाने कहर केला,जोराच्या पावसामुळे या भागातील सर्वच ओढयांना पूर आले होते,यामुळे रात्री यवत सासवड रस्ता व सुपा सासवड रस्ता हे दोन्ही मार्ग बंद होते, पिसर्वे गावच्या पूर्वे व पश्चिम बाजुला असणारे दोन्ही ओढ्यावर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने आज दिवसभर सुपा सासवड रस्ता येथे वाहतूकीसाठी बंद आहे.

पूर्व भागातील माळशिरस,पोंढे, टेकवडी,आंबळे,राजेवाडी, वाघापूर, सिंगापूर या सासवड यवत मार्गावरील सर्वच गावांमध्ये रात्री सात वाजल्या पासून जोरात पाऊस झाला, यामुळे या भागातील शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, पावसामुळं टेकवडी,सिंगापूर येथे सासवड यवत मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी वाहत असल्याने या दोन्ही ठिकाणी रात्रभर वाहतूक बंद होती.

त्याच प्रमाणे सुपा सासवड रस्त्या वरील पिसर्वे, नायगाव, राजुरी, रिसे,पिसे या भागात देखील ढगफुटीच्या प्रमाणे जोरात पाऊस झाला, यामुळे पिसर्वे या ठिकाणी अद्याप पुलावरून पाणी वाहत आहे, यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी येथे बंद आहे.

या परिसरात सर्रास सर्व पिकांचे नुकसान झाले आहे, शासनाने सरसकट सर्वच शेतपिकांची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पिसर्वे चे सरपंच बाळासाहेब कोलते, पिसेचे माजी सरपंच गणेश मुळीक यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com