कशाळच्या कोमलला दहावीत ७४ टक्के गुण

टाकवे बुद्रुक
सोमवार, 11 जून 2018

कशाळ -  कोमल जाधव ७४ टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. कोमल आठवीत असताना तिच्यासह भावंडांच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन सकाळने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लब ऑफ वडगावचे भूषण मुथा व सहकारी, मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था, आधार शैक्षणिक संस्था, विकास असवले, योगेश मोढवे, पिंपरी गृहिणी सुनंदा निकरड, न्यू इंग्लिश स्कूलच्या कर्मचारी सुकन्या शिंदे यांच्या अनेक हात या भावंडांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे सरसावले होते. कोणी त्यांना गणवेश, कोणी वह्या पुस्तके, कोणी सायकल तर कोणी रोख रक्कम देऊन या शैक्षणिक कार्यात मदतीचा हात दिला. 

कोमलचे आईचे छत्र लहानपणीच हरपले आहे, वृद्ध आजी आणि शेतकरी चुलतचुलती तिचे संगोपन करीत आहे. सर्वच भावंडाना शिक्षणासाठी मदतीची गरज असल्याचे वृत्त सकाळने प्रसिध्द केल्यावर तीन वर्षापासून तिच्या मदतीचा ओघ असाच सुरू आहे. तिने खाजगी शिकवणी शिवाय मिळालेल्या यशाने तिचे कौतुक होत आहे. 

या वर्षी तिला भोयरेतील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. तिला पदवी पर्यत शिक्षण घेऊन करिअर करायचे आहे. तिच्या दोन बहिणी अनुक्रमे नववी व आठवीत असून भाऊ सातवीत शिकतोय. सर्वानी केलेल्या मदतीचे तिने न चुकता आभार मानले. 

Web Title: Purvala Kumbla 10 percent to 74 percent marks