esakal | स्थायी समितीचे आयुक्तांसोबतचे भांडण मिटले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे : स्थायी समितीचे आयुक्तांसोबतचे भांडण मिटले

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त सहकार्य करत नसल्याचे कारण देत स्थायी समिती सदस्यांनी त्यांचा निषेध करत स्थायीची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता आठवडाभरानंतर स्थायी समितीचे आयुक्तांसोबतचे भांडण मिटले असून, आज (मंगळवारी) बैठक शांततेत पार पडली.

महापालिका आयुक्त ‘स’ यादीतील कामे मार्गी लावत नाहीत, आम्हाला सहकार्य करत नाहीत त्यामुळे स्थायीची बैठक तहकूब करण्याचा निर्णय स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले होते. तर यावर महापालिकेच्या तिजोरीत किती पैसे आहेत यावरूनच निधी खर्च केला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती.

आठवड्याभरानंतर आज ठरलेल्या वेळेला स्थायी समितीची बैठक सुरू झाली, प्रशासनाने सादर केलेले प्रस्ताव दाखल करून ते मान्य करण्यात आले. तसेच फिरत्या विसर्जन हौदावर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपास सत्ताधारी भाजप व प्रशासनाने एकत्रपणे उत्तर देऊन हा प्रस्ताव कसा बरोबर आहे असे सांगून हा विषय मंजूर करून घेतला.

हेही वाचा: बालवाडी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; सणासाठी मिळणार पाच हजार उचल

आयुक्तांसोबतचा वाद संपला का असे स्थायीचे अध्यक्ष रासने यांना विचारेल असता ते म्हणाले, ‘‘महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी जे उद्दिष्ट ठेवले आहे ते पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे ‘स’ यादीतील कामेही केली जाणार आहेत. प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य केले जाणार आहे. आजची स्थायी समितीची बैठक व्यवस्थित पार पडली.

विरोधकांचा फेरप्रस्ताव दप्तरी दाखल

सुरक्षा रक्षक पुरविण्याचे ४१ कोटीची निविदा स्थायी समितीमध्ये एकमताने मंजूर झाल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसचे नगरसेवक अडचणीत आले होते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली होती त्यामुळे चांगलेच राजकारण पेटले होते. सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचा ठराव दप्तरी रद्द करावा असा फेरप्रस्ताव विरोधकांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. पण भाजपने यास विरोध केला. त्यामुळे भाजपने १० विरुद्ध ६ असा बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला.

loading image
go to top