रस्त्यात लावलेली गाडी बाजूला करण्यास नकार दिला म्हणून जे घडले ते...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

  • रस्त्यात लावलेली गाडी बाजूला करण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर कोयत्याने वार, तर दुसऱ्याला जबर मारहाण
  • मार्केट यार्ड पोलिसांकडु तिघाना अटक

पुणे : रस्त्यात उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास नकार दिल्याच्या व रागाने बघितल्याच्या कारणावरुन तिघानी एका तरुणावर कोयत्याने वार केले.तर तरुणाच्या मित्राला जबर मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री 10 वाजता मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर येथे घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तिघाना अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अल्ताफ रफिक शेख (वय 20), कमरुद्दीन शेख (वय 22), वसीम रफिक शेख (वय 22, तिघेही रा.गल्ली क्रमांक 15, आंबेडकर नगर,मार्केट यार्ड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर विशाल जाधव (वय 21, रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यानेे फिर्याद दिली आहे. 
-------------
पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल हा त्याचा मित्र सतीश कसबे याच्यासमवेत रविवारी रात्री 10 वाजता आंबेडकर नगरमधील गल्ली क्रमांक 15 मध्ये दुचाकी रस्त्याच्या कडेला लावुन गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अल्ताफ हा त्याच्या दुचाकीवरुन तेथून जात होता. त्यावेळी अलताफने विशालला त्याची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी विशालने "तुला जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे. तु तिकडुन जाऊ शकतो" अशा भाषेत सुनावले. त्यावेळी अल्ताफ हा विशालाकडे रागाने पाहत निघुन गेला.

दरम्यान,  फिर्यादी हे त्यांचे मित्र सतीश, सतीशचे वडील रमेश कसबे यांच्यासमवेत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अल्ताफ हा त्याचा भाऊ कमरुद्दीन व वसीम या दोघाना घेऊन आला. त्यावेळी "इन दोनो को बहुत मस्ती आयी है, इनको अब देखता" अशा शब्दात दमदाटी, शिविगाळ करीत फिर्यादीवर कोयत्याने वार केले. तर फिर्यादीचा मित्र सतीश कसबे याला दोघानी पकडुन जबर मारहाण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarrel In Market Yard Pune due to Two Wheeler Parking

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: