इंदापुरातील शेतकऱ्याच्या हिरव्या सोन्याची विजेची तार पडून झाली राख

डॉ. संदेश शहा
Friday, 18 September 2020

मौजे नरूटवाडी ( ता. इंदापूर) येथील शेतकरी भीमाशंकर विलास जाधव यांच्या शेतातील सव्वा एकर ऊस विजेची तार तुटून पडून आग लागल्याने जळला. १४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता ही घटना घडली असून भीमाशंकर जाधव यांचे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

इंदापूर (पुणे) : मौजे नरूटवाडी ( ता. इंदापूर) येथील शेतकरी भीमाशंकर विलास जाधव यांच्या शेतातील सव्वा एकर ऊस विजेची तार तुटून पडून आग लागल्याने जळला. १४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता ही घटना घडली असून भीमाशंकर जाधव यांचे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात करण्यात आलेला नुकसानीचा पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल अशी माहिती वीज मंडळाचे तालुकाअभियंता रघुनाथ गोफणे यांनी दिली.

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

१४ सप्टेंबरला रात्री ८ वाजता विजेची तार तुटून आग लागल्याने जाधव यांच्या सव्वा एकर क्षेत्रातील अंदाजे ७० टन ऊस जळून खाक झाला. जाधव यांनी याची माहिती वीज मंडळास देताच सदर घटनेचा वीज बोर्ड अभियंता मोहन डवस, वायरमन चोपडे, तलाठी सचिन करगळ, कृषी विभागाचे प्रशांत मोरे यांनी संयुक्तपणे पंचनामा केला आहे. पंचनाम्यात अंदाजे 70 टन ऊस जळीत झाला असून १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे.

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

सध्या साखर कारखाने किंवा गूळ कारखाने सुरू नसल्याने ऊस कुठेच पाठवता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र वीज बोर्डाने हे नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकरी भीमाशंकर जाधव यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A quarter acre of sugarcane power line broke and caught fire.