पुण्यात हवामान अंदाजासाठी ‘रडार’ - डॉ. डॉ. मृत्युंजय मोहापात्रा

Dr-Mohapatra
Dr-Mohapatra

पुणे - ‘शहरातील तापमान, पाऊस, वादळ आणि चक्रीवादळांच्या प्रभावाची अचूक माहिती देण्यासाठी पुण्यामध्ये रडार बसविण्यात येणार आहे,’’ अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि थायलंड येथील रिजनल इंटिग्रेटेड मल्टी-हजार्ड अर्ली व्हॉर्निग सिस्टीम यांच्या वतीने ‘ऑपरेशनल क्‍लाईमेट सर्व्हिसेस’ ही बारा दिवसांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे.  या वेळी डॉ. आर. आर. केळकर, डॉ. डी. एस. पैई, डॉ. एस. दत्ता, डॉ. रूपाकुमार कोल्ली उपस्थित होते.

डॉ. मोहापात्रा म्हणाले, ‘‘पाषाण, लोहगावातून हवामानाचा अंदाज वर्तवण्याची प्रणाली प्रगतीपथावर आहे. यापूर्वी तापमान आणि पर्जन्याचीच माहिती शिवाजीनगर येथील हवामान विभागामार्फत देण्यात येत होती. याद्वारे फक्त ५० किलोमीटरच्या भूभागाचा अंदाज दिला जात होता. आता या प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवडसह पाषाण आणि लोहगाव येथील हवामानाचा अचूक अंदाज नागरिकांपर्यंत पोचवला जाईल.’’

‘‘देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि त्यानंतर स्मार्ट सिटींमध्ये रडार बसविले जातील. या मुळे पुढील सात दिवसांचा तसेच दर तीन तासांचा अंदाज देण्यात येईल. याला ‘नाऊकास्ट’, असे म्हटले जाईल. पर्यावरणाच्या निरीक्षणासाठी पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्‍वर आणि दिल्लीची निवड केली आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com