सर्वच शहरात रॅफिड यंत्रणा : डॉ. संदीप पाटील

Rafid system will be set up in all cities says Dr Sandeep Patil
Rafid system will be set up in all cities says Dr Sandeep Patil

बारामती : शहरात पोलिस कर्मचाऱ्यांची दिवसा व रात्रीची गस्त अधिक प्रभावी व्हावी व चोरीसह इतर घटनांना आळा बसावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या पुढाकारातून आता जिल्ह्यातील सर्वच शहरात रॅफिड (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन डिव्हाईस) ही यंत्रणा बसविण्यात आली. 

बारामती शहरात संवेदनशील पन्नास ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरु असून, येत्या दोन दिवसांत या यंत्रणेचे काम सुरु होणार आहे. पोलिस कर्मचारी अनेकदा गस्त घालतात की नाही, ते गस्तीसाठी म्हणून गेल्यानंतर नेमके कोठे जातात याची माहिती वरिष्ठ अधिका-यांना मिळत नाही, अनेकदा गस्ती साठी पोलिस येतच नाहीत, अशा नागरिकांच्याही तक्रारी येतात. यावर पोलिस अधीक्षकांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली. 

रॅफिड ही यंत्रणा अशी आहे की ज्या पोलिसांना ज्या भागात गस्त घालण्याचे काम नेमून दिलेले आहे, त्यांनी गस्तीदरम्यान जेथे जेथे ही यंत्रणा बसवलेली आहे, त्या यंत्रणेला स्कॅन करुनच यायचे आहे. याचा डाटा नंतर पोलिस ठाण्यात संकलित केला जाईल. या डाटामुळे कोणत्या तारखेला, कोणता कर्मचारी कोणत्या भागात गस्त घालून गेला हे सहजतेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजणार आहे. ही नोंद होत असल्याने कर्मचाऱयाच्या यंत्रणा असलेल्या प्रत्येक ठिकाणी जाणे अनिवार्य ठरणार आहे. यामुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षकांना वाटत आहे.

पासपोर्ट पडताळणीही टॅबद्वारे होणार

पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस या पुढील काळात पासपोर्टची पडताळणी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन करणार आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यांना सॉफ्टवेअर भरलेले टॅब दिले गेले असून, पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचा अर्जातील पत्ता व प्रत्यक्ष पत्ता, त्याने दिलेली इतर माहिती याची पडताळणी करुन टॅबवरुनच संबंधित पोलिस कर्मचारी त्वरित ही माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाला कळविणार आहेत. यामुळे पोलिस पडताळणीस गती येईल व लोकांना पासपोर्ट लवकर मिळतील, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com