अख्या पुणे जिल्ह्यात रहाटवडे गावाचीच चर्चा

महेंद्र शिंदे
Tuesday, 19 January 2021

रहाटवडे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी आठ जागांवर महिला सदस्यांना संधी दिली आहे. त्यामुळे रहाटवडे गावात महिलाराज आले आहे.

खेड-शिवापूर  : हवेली तालुक्यातील रहाटवडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा कारभार बिनविरोध महिलांच्या हाती सोपवला आहे. रहाटवडे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ सदस्यांपैकी आठ जागांवर महिला सदस्यांना संधी दिली आहे. त्यामुळे रहाटवडे गावात महिलाराज आले आहे.

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या अन रहाटवडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ग्रामस्थांनी बैठका घेतल्या. या बैठकात गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबरोबर सर्व जागांवर महिलांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांपैकी आठ जागांवर महिलांना बिनविरोध संधी देण्यात आली. तर एका जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्याने त्या जागी पुरुष उमेदवाराची निवड करण्यात आली. त्यामुळे आता पुढील पाच वर्षे रहाटवडे गावच्या कारभाराची धुरा महिलांच्या हाती असणार आहे. रहाटवडे ग्रामस्थांच्या या निर्णयाचे परीसरात कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"महिला गावचा कारभार उत्तमरीत्या चालवू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतीवर जास्तीत जास्त महिलांना संधी देण्यात आली आहे. शिवाय ग्रामपंचायत निवडणूकही बिनविरोध करण्यात आली आहे," अशी प्रतिक्रिया रहाटवडे ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

ग्रामपंचायतीच्या आठ जागांवर...
विद्या अरविंद दरडीगे, आश्विनी मनोहर चोरघे, वैशाली बाबाजी चोरघे, चैताली धनाजी गोरे, सुनीता महेश चोरघे, रुपाली दत्तात्रेय चोरघे, साधना जितेंद्र चोरघे, ललिता महेंद्र चोरघे या महिलांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर एका जागेवर अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिला उमेदवार नसल्याने त्या जागेवर संतोष बबन कांबळे या पुरुष उमेदवाराला संधी देण्यात आली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahatwade villagers gave opportunity to women in eight out of the total nine members of the grampanchayat