राहेल शेकटकर यांना 'इंटरनॅशनल गोल अचिव्हर अवॉर्ड' प्रदान करून गौरविण्यात आले

संदीप जगदाळे
Friday, 18 September 2020

मगरपट्टा येथील राहेल राजेंद्र शेकटकर यांना नवी दिल्ली येथील 'द ग्लोरियस ऑर्गनायझेशन फॉर असेलेरेटेड टू लिटरसी' या राष्ट्रीय संस्थेतर्फे 'इंटरनॅशनल गोल अचिव्हर अवॉर्ड' प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

हडपसर - मगरपट्टा येथील राहेल राजेंद्र शेकटकर यांना नवी दिल्ली येथील 'द ग्लोरियस ऑर्गनायझेशन फॉर असेलेरेटेड टू लिटरसी' या राष्ट्रीय संस्थेतर्फे 'इंटरनॅशनल गोल अचिव्हर अवॉर्ड' प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी कोलकत्ता येथे त्यांना मोस्ट पॉवरफुल वूमन इन इंडिया, नॅशनल लीडरशिप अवॉर्ड इन म्युझिक या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेकटकर यांना २० हुन अधिक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली आहेत. जगातील अव्वल दर्जाचे ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन म्युझिक येथे त्या संगीत विशारद असून तेथे त्या शिक्षक म्हणून काम पहात आहेत. तसेच नवी दिल्ली येथे भारताची राष्ट्रीय प्रतिभा अवॉर्ड देउन त्यांना सन्मानित करण्यात आले.

नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे प्राण वाचविले ग्रामस्थ व पोलीसांनी

शास्त्रीय पध्दतीने व्हायोलिन प. सुरेश गुजर, किराणा घराण्याचे जेष्ठ गायक प. राजकुमार बार्शीकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी गिरविले. त्यांनी कथ्थक शिकून गंधर्व परीक्षाही उत्तीर्ण केली आहे .पाश्चत्य पध्दतीने व्हायोलिन, पियानो, गिटार, ड्रम, कीबोर्ड आदी संगीत प्रशिक्षण त्यांनी लॅन्सीलॉट डिसोझा यांच्याकडून घेतले आहे. वेस्टर्न वोकलमध्ये रॉक आणि पॉप ऑपेरा, वेस्टर्न क्लासिकल यांचे शिक्षण वेंडी डिकोस्टा यांच्याकडून त्यांनी घेतले आहे. नामवंत शेकटकर कुटुंबीय हे गेली तीन पिढ्यापासून संगीताचे घराणे ओळखले जात आहे. नामवंत तबला विशारद किशोर शेकटकर यांची त्या नात आहेत. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahel Shekatkar was honored with the International Goal Achievers Award