नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे प्राण वाचविले ग्रामस्थ व पोलीसांनी

संदीप जगदाळे
Friday, 18 September 2020

नुकतेच जन्म झालेले बाळ रस्त्याच्या कडेला गवतात सोडून गेल्याची घटना उंड्री भागातील होलेवस्ती चौकात गुरुवारी रात्री घडली आहे. नवजात बाळ हि मुलगी असून तीच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करुन ससून रुग्णालयात नेण्यात आले.

कोंढवा - नुकतेच जन्म झालेले बाळ रस्त्याच्या कडेला गवतात सोडून गेल्याची घटना उंड्री भागातील होलेवस्ती चौकात गुरुवारी रात्री घडली आहे. नवजात बाळ हि मुलगी असून तीच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करुन ससून रुग्णालयात नेण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास होलेवस्ती चौकात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या व्यक्तींना लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी हि बाब येथील ग्रामस्थ राजेंद्र भिंताडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीसांना घटनास्थळी पाचारण केले व गवतात टाकलेल्या त्या नवजात बालिकेला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बर्थ डे स्पेशल...डॉक्टर- ॲक्टर ते खासदार : अमोल कोल्हे यांचा झंझावती प्रवास

यावेळी संकेत भिंताडे, पंकज कामठे, लक्ष्मण दिवेकर, प्रेम भिंताडे, अभिजीत भिंताडे, तुषार भिंताडे, विठ्ठल भिंताडे यांनी रुग्णवाहिकेतून बाळाला दवाखान्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. डॉ. विनायक मासाळ यांनी प्राथमिक उपचार करत बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या साफ करुन दुध पाजले व ससून रुग्णालयात नेण्यात आले. बालिकेचे प्राण वाचले असून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक दादाराजे पवार मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers and police save the life of a newborn baby