कर्जबाजारीपणामुळे राहुलची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

महाळुंगे पडवळ - कर्जबाजारी-पणाला कंटाळून राहुल वसंत आंबटकर (वय २७, रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) याने आत्महत्या केल्याची माहिती आंबटकर कुटुंबीयांनी दिली. 

बचत गट, बॅंका, पतसंस्थांचे आंबटकर याच्यावर एकूण दोन लाख ३७ हजार ७०९ रुपयांचे कर्ज होते. राहुल याची महाळुंगे पडवळ येथे वीस गुंठे शेती वडील वसंत आंबटकर यांच्या नावावर आहे. राहुल हा एकुलता एक मुलगा. जमीन कमी असल्याने वडिलोपार्जित शेतीवर भागत नव्हते; म्हणून तो गेल्या चार ते पाच वर्षांपासून परिसरातील दोन ते तीन एकर जमीन खंडाने घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. 

शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतीच्या भांडवलासाठी पतसंस्था, नातेवाईक व बचत गटातून घेतलेले कर्ज फेडणे त्याला अवघड झाले होते. खंडाने घेतलेली शेतीही पैशाअभावी सहा महिन्यांपासून पडून होती. त्यामुळे तो काही दिवस वैफल्यग्रस्त होता, त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे आई रेणुका आंबटकर सांगत होत्या.

घडलेल्या घटनेची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे. कर्ज घेतलेल्या पतसंस्था व बॅंकांकडून माहिती मागविली आहे. चौकशी कमिटी उद्या (ता.१५) घटनास्थळी भेट देणार आहे.    
- रवींद्र सबनीस, तहसीलदार

Web Title: rahul ambatkar suicide