प्रतिक्रिया

प्रतिक्रिया
Published on

मी पन्नास नाही, तर ५०० निवडणुका हरलो तरी चालेल; पण हिंदू-मुस्लिम म्हणत, खोटं पसरवत आणि देशात दंगे भडकावून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही.
- राहुल गांधी, विरोधी पक्ष नेता, लोकसभा

---------------------------
तमिळनाडूचे राजकारण खूप अस्थिर आहे. राहुल गांधी यांनी यावर उघडपणे भाष्य केले आहे की, ‘एनडीए’ सरकारला रोखण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. मला विश्‍वास आहे की हळूहळू हा प्रश्‍न सुटेल.
- संजय राऊत, राज्यसभा खासदार, उबाठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी बंगाल व आसाममध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुका लढविल्या. सुसंघटित आणि व्यावसायिक पद्धतीने प्रचार मोहीम राबविली. यातून इतर पक्षांनी धडा घेण्यासारखे आहे.
- शशी थरूर, खासदार, काँग्रेस

न्यायमूर्ती टी. एस. शिवज्ञानम. निवडणूक संबंधित अपिलांची सुनावणी करणाऱ्या १९ न्यायाधिकरणांपैकी एका न्यायाधिकरणाने १,७७७ प्रकरणांचा निपटारा केला असून त्यापैकी १,७१७ नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली. त्यांच्या मते, याचा अर्थ ९६ टक्क्यांपेक्षा अधिक नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली होती.
- कपील सिब्बल, राज्यसभा खासदार, काँग्रेस

मी आधीच मागणी केली आहे की मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करा. व्हीव्हीपॅट स्लिपचू मोजणी करा. कारण सत्य समोर येऊ द्या आणि प्रत्येक संशय दूर होऊ दे.
- अभिषेक बॅनर्जी, खासदार, तृणमूल काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com