Rahul Gandhi Banner : "हिंदुस्थानचा भावी पंतप्रधान राहुल गांधी" पुण्यात मुख्य चौकातल्या बॅनरची जोरदार चर्चा

Rahul Gandhi : पुण्यात राहुल गांधी यांचा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. “हिंदुस्थानचा पुढचा पंतप्रधान राहुल गांधी” असा उल्लेख असलेल्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Rahul Gandhi Banner 

Rahul Gandhi Banner 

Updated on

Rahul Gandhi Prime Minister of India : पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा ‘हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी शनिवारी (ता. २२) पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील शास्त्री रोडसह विविध भागांत हे बॅनर झळकले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी काळात देशात सत्ताबदल होण्याचा दावा केल्याने या बॅनरची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com