

सावरकर मानहानी खटल्यात
राहुल गांधी यांना दिलासा
याचिकाकर्त्यांची वैयक्तिक कारणास्तव याचिका मागे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयी मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला अखेर निकाली निघाला आहे. या खटल्याचे याचिकाकर्त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव याचिका मागे घेतली. त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. एल. नरवाडिया यांनी सदरील प्रकरण तक्रारदाराने मागे घेतल्याने खटला निकाली काढला. यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मानहानीकारक वक्तव्य केले होते. याप्रकरणी शहरातील निभर्या फांऊडेशनचे देवेंद्र भुतडा यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात २०२२ मध्ये खटला दाखल केला होता. गेल्या चार वर्षांपासून याबाबत न्यायालयीन खटल्याचे कामकाज सुरू होते. मध्यंतरी न्यायालयाने राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्सही जारी केले असता, त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले होते. दरम्यान, अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने खासदार, आमदार यांच्यासंदर्भातील न्यायालयीन खटले जलदगतीने चालविण्याचे आदेश दिले होते. या खटल्यातील याचिकाकर्ते देवेंद्र भुतडा हे परदेशात स्थित झाल्याने त्यांना या खटल्यात दरवेळी उपस्थित राहणे अशक्य असल्याने त्यांनी न्यायालयात याचिका मागे घेली. तर, राहुल गांधी यांचे वकील ॲड. जयंत जायभावे यांनी यापूर्वीच न्यायालयात या खटल्यात फारसे तथ्य नसल्याच्या कारणास्तव खटल्याबाबत फौजदारी पुनरावलोकन अर्ज न्यायालयात दाखल केला होता. तोही न्यायालयाने मंजूर केला. परिणामी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नरवाडिया यांनी खटला रद्द करीत निकाली काढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.