esakal | लोहगावातील देहविक्रीच्या व्यवसायावर छापा, तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

लोहगावातील देहविक्रीच्या व्यवसायावर छापा, तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोहगाव (lohgaon) परिसरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर विमानतळ पोलिसांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी छापा टाकला. तेथून पोलिसांनी तिघांना अटक केली. उदय श्रीरामजी सिंग (वय 38), विजयकुमार बिहारीलाल गुप्ता (वय 25) आणि चंद्रशेखर विश्वनाथ हेगडे (वय 54, तिघेही रा. हॉटेल तोरणा बार अँड रेस्टॉरंट, लोहगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी वसंत भोजराज शेट्टी व प्रदीप नारायण शेट्टी यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: Pune : लष्करी इतिहास लेखनाची संधी अभिमानास्पद; कुलगुरू डॉ. करमळकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील पोरवाल रस्त्यावर "हॉटेल तोरणा बार अँड रेस्टॉरंट' नावाचे हॉटेल आहे. संबंधीत हॉटेल आरोपींनी मुळ मालक दगडु खांदवे यांच्याकडून भाडेकराराद्वारे चालविण्यास घेतले होते. संबंधीत हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केली. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी तेथे छापा टाकून तिघांना अटक केली. त्याचबरोबर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव करीत आहेत.

loading image
go to top