esakal | Pune : लष्करी इतिहास लेखनाची संधी अभिमानास्पद; कुलगुरू डॉ. करमळकर
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule Pune University approved 31 new colleges

Pune : लष्करी इतिहास लेखनाची संधी अभिमानास्पद; कुलगुरू डॉ. करमळकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सैन्याच्या इतिहासाबरोबरच पारतंत्र्यापुर्वीच्या लष्करी इतिहासावर संशोधन करण्यासाठी चेअर ऑफ एक्सलेन्सची विद्यापीठात स्थापना करण्यात आली आहे. देशभरातील १०० विद्यापीठांपैकी संरक्षण मंत्रालयाने आमची निवड करणे निश्चितच गौरवपूर्ण आहे. त्याही पेक्षा देशाच्या लष्करी इतिहासाच्या लेखनाची संधी मिळणे अभिमानास्पद आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केली. यावेळी संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मयांक तिवारी उपस्थित होते.

संरक्षण मंत्रालय आणि विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागामध्ये शुक्रवारी सामंजस्य करार झाला. यावेळी मंत्रालयाचे प्रशिक्षण विभाग संचालक एस.गोपालकृष्ण, लष्करी इतिहास विभागाचे डॉ. ए.के. मिश्रा, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभाग प्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते. तीन वर्षाच्या या सामंजस्य करारासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा: बारामती-इंदापूर तालुक्यातील पिकविमा धारकांना 25 टक्के आगाऊ रक्कम

चेअर ऑफ एक्सलेन्स :

  • देशाच्या प्राचीन ते आजवरच्या लष्करी इतिहासावर संशोधन करणार

  • शोधनिबंध प्रकाशित करणे, परिषदा, चर्चासत्रे आदींचे आयोजन करणे

  • ऐतिहासिक तथ्यांचे संग्रह करणे, कागदपत्रांचे संकलन आणि संवर्धन

  • सैन्याच्या संरक्षण आणि सामरिक धोरणासंबंधी जागृती करणे

देशाच्या सैन्याचा अभिमानास्पद इतिहास, परंपरांची आणि शौर्याची माहिती येणाऱ्या पिढीला होणे गरजेचे आहे. विद्यापीठातील या चेअर ऑफ एक्सलेन्सच्या माध्यमातून सैन्याने केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्यांना होईल.

-मयांक तिवारी, संयुक्त सचिव, संरक्षण मंत्रालय

हेही वाचा: पुणे शहरात डुक्करांचा सुळसुळाट

आकडे बोलतात...

मिळालेले निधी : २ कोटी

सामंजस्य कराराची वर्षे : ३ वर्षे

किती महिन्यांनी आढावा घेणार : दर ३ महिन्यांनी

किती विद्यापीठातून निवड : १००

loading image
go to top