शिक्षक भरतीप्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये छापे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करणे, अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या संभाजी शिरसाट या मुख्याध्यापकाच्या घरीही पोलिसांनी शोध मोहीम राबविली.

पुणे - शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करणे, अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या संभाजी शिरसाट या मुख्याध्यापकाच्या घरीही पोलिसांनी शोध मोहीम राबविली. पिंपरी-चिंचवडमधील राजे शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयाचे ते मुख्याध्यापक आहेत. इतर ठिकाणी छापे टाकलेल्या व्यक्ती या संशयित आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शिक्षकांच्या बनावट मान्यता तयार करून त्यांना वेतन सुरू करण्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उजेडात आणले होते. त्यानंतर राज्यातील शिक्षक भरतीची चौकशी सुरू झाली. पुण्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीबाबतही चौकशी करण्यात आली. सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसेच, चार हजार ११ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातून शिरसाट याच्या विरोधात फसवणुकीची आणखी प्रकरणे पुढे येण्याची चिन्हे आहेत.

पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता; नव्याने होणार निविदा प्रक्रिया

गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत छापे मारण्यासाठी पुणे पोलिसांनी सहा पथके स्थापन केली होती. या पथकांनी सकाळी आठ वाजल्यापासूनच संशयितांच्या घरी आणि कार्यालयात छापे टाकण्यास सुरुवात केली. कारवाईदरम्यान बरेचसे कागदपत्रे पोलिसांनी संबंधितांकडून जप्त केली आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती.

मतदानासाठी दोन तासांची सवलत द्या; जिल्हाधिकाऱ्यांनी काढलं फर्मान!

या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरीत सहा ठिकाणी छापे टाकले. यातील संभाजी शिरसाट हे आरोपी व इतर संशयित व्यक्ती आहेत. महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
- डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raids Pune Pimpri Chinchwad on teacher recruitment