मतदानासाठी दोन तासांची सवलत द्या; जिल्हाधिकाऱ्यांनी काढलं फर्मान!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे.

पुणे : ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत असून, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसल्यास किमान दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते. काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्थांमध्ये भरपगारी सुटी किंवा सवलत दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागते. निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, औद्योगिक कारखाने, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाटयगृहे, व्यापार तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्सना हा आदेश लागू राहील. पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसल्यास सुटीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई 
जिल्ह्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाईची निशाणी मिटलेली नसेल, त्यावेळी डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hours concession right to vote ordered Pune Collector Rajesh Deshmukh