पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता; नव्याने होणार निविदा प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

राजकीय नेत्यांच्या हट्टापायीच हे काम ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. दुसरीकडे या कामासाठी ठेकेदार नेमल्यानंतर कचऱ्यासाठी पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. 

पुणे- शहरातील कचरा गोळा करून त्याच्या वर्गीकरणासाठी ठेकेदारांची फौज नेमली जाणार असून, त्यासाठी निविदा काढण्याच्या हालचाली महापालिका करीत आहे. गंभीर बाब म्हणजे, राजकीय नेत्यांच्या हट्टापायीच हे काम ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. दुसरीकडे या कामासाठी ठेकेदार नेमल्यानंतर कचऱ्यासाठी पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, शहर आणि उपनगरांत घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासोबतच त्याच्या वर्गीकरणाच्या कामाची जबाबदारी असलेल्या "स्वच्छ' संस्थेची मुदत संपल्याने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, ही मुदत संपल्यानंतर नवे ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया आता करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

पुण्यातील इंजिनिअरिंगच्या तरुणीला फास्ट बाईक चालवणं पडलं महागात!​

घरे आणि व्यावसायिक ठिकाणी तयार होणारा कचरा रोजच्या रोज सकंलिक करून त्यातील ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी प्रत्येक घरमालकांकडून महिन्याकाठी 50 रुपये आणि व्यावसायिकांकडून किमान शंभर रुपये घेण्यास महापालिकेची परवानगी आहे. त्यानुसार महापालिका आणि स्वच्छ संस्थेत करारही झाला आहे. मात्र, करार संपल्याने "स्वच्छ'ऐवजी अन्य कंपन्यांना कामे देण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यातून विविध भागांतील कचरा संकलनाच्या कामासाठी ठेकेदार नेमून, कचऱ्यावरील प्रक्रियेचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत. 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

एकाचवेळी बहुतांशी घरांमधील कचरा गोळा करून त्याची वाहतूक सोयीची होण्यासाठी स्वच्छ संस्थेची नेमणूक केली आहे. त्यासाठी महापालिकेने 2016मध्ये पाच वर्षांसाठीचा करार केला आहे. त्यानुसार साडेआठ लाख निवासी आणि व्यावसायिक मिळकतींमधील कचरा गोळा केला जातो. कचरा गोळा करण्यासोबत त्याच्या वर्गीकरणासाठी आवश्‍यक साहित्य पुरविण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. त्याशिवाय, कचरावेचकांसाठी सुरक्षिततेचा साहित्य उपलब्ध करून दिले जाते. 

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

"स्वच्छ'च्या माध्यमातून संकलित होणारा कचरा : 8 लाख लाख 50 हजार मिळकती (निवासी, व्यावसायिक) 
-प्रत्येक घरांसाठी दर : निवासी 70 रुपये 
-व्यावसायिक : 140 रुपये 
-कचरा गोळा करणारे स्वच्छचे कर्मचारी : 3,500 
-महापालिकेकडून "स्वच्छ'ला मिळणारे निधी : चार कोटी रुपये (वार्षिक)

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizen to pay extra for garbage collection and sorting