सातारा रस्त्यावरील लॉजवर छापे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे - सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील तीन लॉजवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापे टाकून वेश्‍या व्यवसाय चालविणारे रॅकेट उघडकीस आणले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून 26 सज्ञान मुलींची वेश्‍या व्यवसायातून सुटका केली. 

स्वारगेटचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकसह इतर राज्यांतून मानवी तस्करी करण्यात येत आहे. पुणे शहरात मुलींना आणून जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करून घेतला जात असल्याची तक्रार मानवी तस्करी प्रतिबंधकसंदर्भात काम करणाऱ्या संघटनेचे सरुबेन येसुदास जॉर्ज यांनी केली होती. त्यावरून पोलिसांनी बालाजीनगर येथील रविकिरण लॉज, एन. एम. लॉज (नित्यानंद) आणि सागर लॉजवर बनावट गिऱ्हाईक पाठवून छापा टाकला. 

पृथ्वीराज सिंग (रा. रविकिरण लॉज, बालाजीनगर), विनोद अक्षय पांडे (रा. अंजनीनगर, कात्रज), सचिन दत्तात्रेय इंगळे (बालाजीनगर), अनिल रावसाहेब लोंढे (रा. बालाजीनगर), सतीश चलवेगौडा (रा. सागर लॉज, बालाजीनगर) तसेच लॉजचालक रघू शेट्टी, शेखरअण्णा, रूपेश राजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या कारवाईत कोलकता, झारखंड, नवी मुंबई आणि पुण्यातील 26 मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची हडपसर येथील रेस्क्‍यू फाउंडेशन, चैतन्य महिला मंडळ, मोशी आणि मुंढव्यातील राज्य महिलागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: Raids on Satara Road Lodge